मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून नाभिक समाजाचा अपमान केल्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 18 Nov 2017 07:12 PM (IST)
पुण्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात नाभिक समाजाविषयी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन नाभिक उस्मानाबादमध्ये नाभिक महामंडळानं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.
उस्मानाबाद : पुण्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात नाभिक समाजाविषयी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन नाभिक उस्मानाबादमध्ये नाभिक महामंडळानं मुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 नोव्हेंबर रोजी पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घघाटनावेळी नाभिक समाजावरुन वक्तव्य केलं होतं. आघाडी सरकारच्या काळातील सिंचन योजनांवर खर्च केलेल्या पैशांवरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यासाठी त्यांनी नाभिकाचं उदाहरण दिलं होतं. यावरुनच नाभिक समाजाने तीव्र आक्षेप घेतला असून, उस्मानाबादमध्ये नाभिक महामंडाळानं मुख्यमंत्र्यांचा निषेध करत, त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. दरम्यान, यावरुन मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे नाभिक महामंडळाची माफी मागितली आहे. तसेच आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यावर दिलगिरी व्यक्त करत असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री?