पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2017 02:29 PM (IST)
कोल्हापूर पब्लिक स्कूलमधील हॉकी प्रशिक्षकानं 4 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये हॉकी प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NEXT
PREV
कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाने चार अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे, यातील एका मुलीवर प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची माहितीदेखील समोर आली आहे. याप्रकरणी राजाराम पोलीस ठाण्यात प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात कोल्हापूर पब्लिक स्कूल आहे. या शाळेतील हॉकी प्रशिक्षक विजय मनुगडे याने मे महिन्यापासून हॉकी प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने 4 अल्पवयीन मुलीचं लैगिंक शोषण सुरू केलं. तसेच त्यातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार देखील केला.
या प्रशिक्षकाने हे सर्व कृत्य त्याच्या घरी आणि शाळा परिसरात केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. या संदर्भात मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्यावर हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात प्रशिक्षक विजय मनुगडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कोल्हापूर पब्लिक स्कूल आणि संशयित आरोपीच्या घरासमोर कडक बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहटकर आज कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांनी पीडित मुलीची भेट घेतल्यानंतर घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -