Bhandara News भंडारामाजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या सत्ताकाळात 2012 मध्ये 40 हजार रोहिंग्या दिल्लीत आलेत. मनमोहन सिंगांनी त्या सर्वांना दिल्लीत बसविले. त्यांनी लोकसभेत ठराव घेतला हे रोहिंग्या सहा वर्ष दिल्लीत राहतील. मात्र, आता 2012 ते 2014 या 12 वर्षांचा कालावधी झाला असतानाही हे रोहिंग्या अजूनही दिल्लीत वास्तव्यास आहेत. ते परत माघारी गेले नसल्याचा खळबळजनक आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनी केला आहे. भंडारा इथं भाजप जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. 


... अन्यथा 90 टक्के रोहिंग्या त्रिपुरामार्गे भारतात घुसले असते


2017-21 मध्ये म्यानमारमध्ये पुन्हा उठाव झाला, त्यावेळी पूर्ण रोहिंग्या बाहेर आलेत. ही संख्या जवळ जवळ 7 लाखांच्या घरात होती. मात्र, त्यावेळी हे लोक भारतात आले नाहीत. तर ते बांग्लादेशात गेलेत. त्यावेळी सरकार आपलं नसतं तर, त्यातील 90 टक्के रोहिंग्या त्रिपुरामार्गे भारतात घुसले असते. मोदींनी सीमांकन केलं आहे. त्यामुळे हे रोहिंग्या थांबलेत, ही ताकद मोदी सरकारची आहे. सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी सुद्धा आता देश पूर्णपणे सुरक्षित होत चालला असल्याचे गौरोद्गार काढले आहे. देशाला भाजप सुरक्षित करीत आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ता हा देशभक्त असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय गृह राज्य तथा राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केलं. 


विदर्भात पुन्हा 40 प्लस चा आकडा, भंडाऱ्यावर मोठी जबाबदारी


विदर्भामध्ये पुन्हा 40 प्लस चा आकडा आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर भंडारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. राजकीय प्रस्ताव हा दीड हजार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडायचा होता. मात्र, भंडारा येथील बैठकीला केवळ 245 पदाधिकारी उपस्थित असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणातून नाराजी व्यक्त करीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेतल्या. 


भंडाऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून नाराजी व्यक्त करतानाच बावनकुळे यांनी वर्धा आणि पुसद या जिल्ह्यात झालेल्या अधिवेशनाबाबत तारीफ केली. वर्ध्येत बुथ अध्यक्ष, सचिव महिला अध्यक्ष, सोशल मीडिया अध्यक्ष, मागासवर्गीय अध्यक्ष असे साडे तेराशे पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचं महाअधिवेशन घ्यायचं आहे. दोन विधानसभेचा सर्वात लहान जिल्हा असलेल्या पुसद येथेही महाअधिवेशन मोठ्या थाटात झालं. मात्र भंडाऱ्यात बैठकीला 245 पदाधिकारी आणि कोर ग्रुप मंचावर बसला असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांच्या कमी उपस्थिती वरून महाअधिवेशन होऊ शकत नाही. अधिवेशनाला उंची द्यावी लागेल. एक वेगळा संदेश महाअधिवेशनाच्या माध्यमातून भंडाऱ्यातून द्यायचा आहे, आणि तो संदेश विदर्भात किती समोर जावू शकतो, हा संदेश असणार असल्याच्या कानपिचक्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या