मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला अखेर अटक करण्यात आली. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातल्या कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे. तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता. याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या.

कोण होत्या गौरी लंकेश ?
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.

Gangster Ejaj Lakdawala | दाऊदचा एकेकाळचा हस्तक एजाज लकडावाला अटकेत | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha



संबंधित बातम्या : 

शेतकरी आत्महत्येचे चार वर्षांपासून लपवलेले सरकारी आकडे अखेर जाहीर; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

विनयभंगप्रकरणी डीआय़जी निशिकांत मोरे निलंबित, अटकपूर्व जामीन फेटाळला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचीही हकालपट्टी