पनवेल : पनवेल महापालिका जिंकण्यासाठी महाआघाडीने कंबर कसली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत विरोधकांशी दोन हात करणार आहेत. यासाठी या महाआघीडचं जागावाटपही पूर्ण झालं आहे.


पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाआघाडी झालेली आहे. महाआघाडी झाली असली तरी गेल्या चार दिवसापासून जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नव्हता.

काँग्रेसची जास्त जागांची मागणी होत होती. अखेर महाआघाडीचे समन्वयक शेकाप नेते विवेक पाटील यांनी भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना जागावाटपाबाबत नरमाईची भूमिका घेण्याचे आवाहन केल्यानंतर मार्ग सुकर झाला.

पनवेल महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. यामध्ये शेकाप 48, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महाआघाडी, भाजप आणि शिवसेना असा तिरंगी सामना पनवेल मनपात पाहायला मिळणार आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीबाबत माहिती :

  • अर्ज दाखल करण्याची तारीख : 29 एप्रिल ते 6 मे

  • अर्ज छाननी तारीख :  8 मे

  • चिन्ह वाटप : 12 मे

  • मतदानाची तारीख : 24 मे

  • मतमोजणी : 26 मे