मुंबई : लाॅकडाऊनचा सध्या चौथा टप्पा सुरु आहे आणि केंद्र सरकारच्या पुढच्या निर्णयाची सगळे जण आतुरतेनं वाट पाहत आहेत. जून महिन्यात साधारणपणे शाळा सुरु होतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा कधी आणि कशा सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. यांसर्भात शालेय शिक्षण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करणार असल्याचं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितलं.
शैक्षणिक वर्ष सुरु होणार म्हणजे शाळा सुरु होणार असं नाही. तर 15 पर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटली पोहोचून त्यांचा अभ्यास सुरु करणार असल्याचं विशाल सोळंकी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
“15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करत आहोत. म्हणते डिजिटली मुलांपर्यंत पोहोचून त्यांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पाठ्यपुस्तकांच्या वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे 15 जूनच्या आधी जास्तीत जास्त पाठ्यपुस्तक वितरित करण्याचा प्रयत्न आहे,” अशी माहिती विशाल सोळंकी यांनी दिली.
जादा शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाई करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा
शाळा सुरु करण्याचा निर्णय हा लाॅकडाऊनच्या निर्णयावरही अवलंबून असल्याचं ते म्हणाले. 31 मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय निर्णय घेतं यावरही शाळा कधी सुरु होणार हे अवलंबून राहील.
पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी 15 जूनपासून डिजिटली शैक्षणिक वर्ष सुरु करणार असल्याचं विशाल सोळंकी यांनी सांगितलं. यामुळे 15 जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरु जरी झाली नाही तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास मात्र सुरु होईल.
राज्यातील शाळांची फी वाढ रोखा; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलारांचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई : शिक्षणमंत्री
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाले आहे, त्यामुळे अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा पालकांची अडचण लक्षात घेऊन यंदा राज्यातील शाळांनी फी वाढ करू नये अशी शिक्षण विभागाने भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी देखील दिला होता.
15 जूनपासून शाळा ऑनलाईन सुरु होणार, शिक्षण आयुक्तांची माहिती
मानसी देशपांडे, एबीपी माझा
Updated at:
27 May 2020 11:26 AM (IST)
जून महिन्यात साधारणपणे शाळा सुरु होतात. मात्र सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा कधी आणि कशा सुरु होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. याबाबत महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -