हिंगोली : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना दिलासा देणारा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिलाय. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्या बोलत होत्या.


कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील क्वॉरंटाईन सेंटरची पाहणी केली. तसेच खरीप हंगाम सन 2020-21मध्ये बांधावर शेतकरी गटामार्फत खते, बियाणे औषधांचे वाटप केले. पालकमंत्री या वेळी एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, की ज्या खाजगी शाळा पालकांकडून ज्यादा शुल्क आकारतील अशा शाळांवरती कार्यवाही करू. त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक वर्ष 15 जूनला होतं. याही वर्षी 15 जूनलाच शाळा सुरू करण्याचा मानस आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता यावर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खासगी शाळांनी शुल्क वाढवू नये, पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. कारण यावर्षी कोरोणामुळे पालकांची परिस्थिती नाजूक असल्याने शाळांनी हा निर्णय असे त्यांनी म्हटले आहे.


राज्यात अडकलेल्या लोकांना गावी परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा : अनिल परब


दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता
कोरोना व्हायरसमुळे दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला. मात्र, अद्याप पेपर तपासणीला सुरुवात करण्यात आली नाही. परिणाणी दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षकांना घरी पेपर तपासण्यासाठी देण्यात यावेत, अशी सूचना पुढे आली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी पेपर पोहचवण्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे अद्यापतरी पेपर हे बोर्डातचं पडून आहेत.


Minister Anil Parab on ST Bus Service | एसटीतर्फे बससेवा मोफत : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती