Jalna News : शाळकरी मुलाचे अपहरण (Kidnapping) करुन 5 कोटी रुपयांची खंडणी (Extortio) मागितल्याची घटना जालन्यात (Jalna) घडली आहे. काल सकाळी शाळेत जाताना 11 वर्षाच्या मुलाचे तीन आरोपींनी अपहरण केले होते. संध्याकाळी पोलिसांनी (Police) पाठलाग करुन समोरुन गाडी आडवी लावून आरोपींना पकडलं आहे. या घटनेचा एक्सकल्युजिव व्हिडिओ देखील आहे. 


7 तासात तीनही आरोपी जेरबंद


जालना शहरात काल शाळेमध्ये जाणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  पोलिसांनी 7 तासात तीनही आरोपींना जेरबंद केलं आहे. काल सकाळी माहिती मिळाल्यानंतर दिवसभर पोलिसांकडून शोधा शोध सुरू होती. पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शहरातील मोंढा परिसरामध्ये सदर आरोपी या मुलाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यावेळी साने गुरुजी शाखेच्या पथकाने पाठलाग करत आरोपींच्या कारसमोर दुचाकी आडवी  लाऊन आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nagpur Crime News : भरदिवसा कॅफे मालकाचे अपहरण करून मारहाण; मुलीशी बोलण्याचा वाद विकोपाला