Scholarship Holder Students News : 'राईट टू गिव्ह अप' (right to give up) हा पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे (Scholarship) अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना पुन्हा शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आहे. अर्ज रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे आपले अर्ज दुरुस्त करुन ते पुन्हा सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. संबधित अर्ज रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. 


राज्य सरकारनं शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच राईट टू गिव्ह अप चा पर्याय उपलब्ध करुन दिला होता. स्वच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र सरकारच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरुपाची योजना यापूर्वी राबवण्यात आली होती. याच धर्तीवर शिष्यवृत्तीसंदर्भात पर्याय उपलब्ध करुन दिला होता. मात्र, काही विद्यार्थ्यांवी चुकून या पर्यायाची निवड केली होती. त्यामुळं त्याच्या शिष्यवृत्तीसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळं यासंदर्भातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. 


विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करावेत 


दरम्यान, राईट टू गिव्ह अप हा पर्याय चूकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही  यासाठी सरकारनं खबरदारी घेतली आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील अशा विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे 30 जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून ऑनलाईन सादर करावेत.


महत्वाच्या बातम्या:


विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती


महत्वाच्या बातम्या:


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI