सातारा: एक मोठी घोषणा करणार आहे....संध्याकाळी सहा वाजता साताऱ्यातील गांधी मैदानात उपस्थित रहा असं आवाहन खासदार उदयनराजेंनी केलं आहे. खासदार उदनयराजेंच्या या घोषणेसाठी काही तासांचा अवधीच राहिला आहे. आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे आता काय मोठी घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 


खासदार उदयनराजेंच्या वतीने बुधवारी एक महत्त्वाचे निवेदन काढण्यात आलं. त्याला निमंत्रण पत्रिका असं म्हटलं असून त्यामध्ये आपण एक मोठी घोषणा करणार असून संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी गांधी मैदानात उपस्थित रहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. 


उदयनराजेंच्या निमंत्रण पत्रिकेत काय म्हटलंय? 
खासदार उदयनराजेंच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. हे विशेष निमंत्रण सर्व पत्रकार आणि जनतेस असल्याचं त्यांनी सुरुवातीला नमूद केलं आहे. या निवेदनात ते म्हणतात की, या 24 तारखेला एक मोठी घोषणा करायचं मनात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे आहे. 


खासदार उदयनराजे पुढे म्हणतात की, आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी इच्छा आपण व्यक्त असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे, प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचं ठरविले आहे. कोणता प्रश्न, काय व्यवस्था... अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणास सदर पत्राने आमंत्रण देत आहोत. 


खासदार उदयनराजेंनी गुरुवारी संध्याकाळी सर्वांना साताऱ्यातील गांधी मैदानात हजर राहण्याचं आवाहन केलं आहे


संबंधित बातम्या: