सातारा : बसचे अपघात होणे हे काही नवीन नाही. कायम बस चालकाला अपघातासाठी दोषी ठरवलं जातं. मात्र, याच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुटी खिंड येथे वडूज येथून साताऱ्याला निघालेल्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले आहे. मात्र, बसचालकाने मोठ्या हुशारीनं प्रवाशांना धोक्याचे बाहेर काढले.

Continues below advertisement


नेमकं काय घडलं? 


तीव्र उतार आणि मोठे वळण असल्यामुळं बस नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, प्रसंगावधान राखून चालक देवदास वायदंडे यांनी हॅन्ड ब्रेक ओढला आणि बसमधून 51 लोकांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या कोणत्याही वाहनांना बसचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्याच्या शेजारील नाल्यात आणि झाडावर नेऊन आदळली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीवही वाचला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून या बस चालकाने 51 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत .यामुळं बस चालकाचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 


चालकाचे सर्व प्रवाशांनी मानले आभार 


दरम्यान, या घटनेमध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापती व्यतिरिक्त कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वडूज ते सातारा बसमधून 51 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी चालकाचे सर्व प्रवाशांनी आभार मानले. या घटनेची नोंद कोरेगाव येथील पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Wardha News : पोलीस कर्मचार्‍याच्या गाडीचा भीषण अपघात; कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघे ठार, वर्धातील दुर्दैवी घटना