Prakash Ambedkar: परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती .याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली .ऍड प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली आहे .ये सुनावणी दरम्यान काय झालं हे त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे .गेल्या अनेक दिवसांपासून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक व्हावी अशी मागणी आहे . (Prakash Ambedkar)

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

न्यायालयीन कोठाडीत मृत्यू झाल्यावर मॅजेस्ट स्टेटमेंट चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे ?याविषयीचा कायदा अपूर्ण आहे .त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी अशी मागणी न्यायालयाने केली आहे .सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आम्ही एसआयटी नेमण्याची मागणी केली .ही एसआयटी कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी .मध्यंतरी गुन्हे अन्वेषण विभागाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत चौकशी केली होती .पुढच्या सुनावणीच्या वेळी सीआयडी ला आरोपी करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे .हायकोर्टाकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे .29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला न्यायालयाने सांगितले आहे .याप्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले .

 

हत्येचा गुन्हा दाखल करा, कुटुंबियांची मागणी

दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आता सीआयडी कडून तपास केला जाणार आहे .मात्र आम्हाला न्याय हवाय .आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालातही पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे .मात्र तरीही सरकार न्याय देत नाही .जे जे दोषी आहे तर त्यांच्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी सांगितलं .  काही दिवसांपूर्वी परभणी हिंसाचार प्रकरणात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीत मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल सव्वातीन महिन्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या (Somnath Suryawanshi) न्यायालयीन मृत्यूप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) कडे वर्ग करण्यात आला हाेता.

हेही वाचा:

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर, कारवाईला वेग येणार?