Udayanraje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : हत्ती  घेऊन चिरडायचे कशाला, तुम्ही उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा प्रतिहल्ला शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर केला आहे. साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर खरेदी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे यांनी केला होता. याबाबत शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदे घेत उदयनराजेंवर गंभीर आरोप केले आहेत. साताऱ्यातील एमआयडीसीची दैनी अवस्था ही उदयनराजेंच्या धमक्या आणि खंडण्यांमुळे झाल्याचा गंभीर आरोप केला. 


हत्ती आणून चिरडून टाकेन असे उदयनराजेंनी धमकी दिल्यानंतर याला प्रतिउत्तर देताना आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्ही हात्ती शोधणार, वन विभागाची परवनागी घेणार नंतर चिरडणार. हे करत बसण्यापेक्षा तुम्ही नुसती माझ्या आंगावर उडी मारली तरी मी चिरडला जाईन. मी त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर रहात असल्याचे सांगित हिम्मत असेल, तर या असे खुले आवाहन शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना दिले.


शिवेंद्रराजे यांनी काय म्हटले?


मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन.
कारखानदारांकडून हप्ते घेणं त्यांना दमटाटी करणं, यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत. तसेच असलेल्या कंपन्याही निघून गेल्या.
लिलाव सहा वेळा काढला तेंव्हा का यांनी आवाज उठवला नाही. तु्म्ही त्यावेळी का हरकत घेतली नाही.
धमक्या देणे हे सातारकरांना सवय झाली आहे.
खासदारांनी तेथे येऊन काही केले तर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करणार.
तुम्हालाजा जायचे तर हायकोर्टात जावा, ते निर्णय देतील.
आम्ही काय पाकिस्तानमधून आलो नाही. व्यवसाय आहे. सगळेच व्यवसाय करतात. आम्ही कारखानदारांनाच ही जागा दिली. हा निर्णय सातारच्या दृष्टीने चांगलाच आहे.
कंपन्यांना धमक्या देणे हे यांचेच काम आहे. 
सातारची एमआयडीसी वाढत नाही, त्याला एकमेव कारण हे उदयनराजे आहेत. तेथे आलेल्या माणसांना धमक्या द्यायच्या वसुल्या करायच्या.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live