सातारा : साताऱ्यातील मांढरदेवी गडावर एकाच कुटुंबातील सहा जणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांवर उपचार सुरु आहेत.
चव्हाण कुटुंबातील सहा जणांनी मांढरदेवी गडावर विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यात स्वप्निल चव्हाण या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, सुनिता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण सुदैवाने बचावल्या आहेत.
चव्हाण कुटुंबातील विषप्राशन केलेल्या तिघांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर दोघांवर वाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.