सातारा : सातारा शहरात एका सव्वा वर्षाच्या बाळाच्या विक्रीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 15 हजार रुपयांना बाळ विकणाऱ्या महिलेला आता दहा महिन्यानंतर पुन्हा बाळ हवे असल्यामुळे गोंधळ उडाला आहे. बाळ विकत घेणे हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यात बाळ विकत घेणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील मंगळवार पेठेत महिला पायल कुचेकर या महिलेला पैशाची गरज असल्यामुळे तिने स्वत:चे बाळ विकण्याचा निर्णय घेतला आणि तिने ते बाळ सदरबझार येथील बाबर कुटुंबाला 30 हजार रुपयांना विकले होते. दहा महिन्यानंतर संबधित महिला पुन्हा बाळ मागण्यासाठी आली असता बाबर कुटुंबाने ते बाळ देण्यास नकार दिला. यावरुन पायलने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीरवरुन संजय बाबर आणि त्याची पत्नी अश्विनी बाबर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाळ विकल्याच्या कारणातूनही बाळाच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल होणार आहे. या वादातून हे बाळ सध्या म्हसवड येथील शिशू गृहात ठेवले आहे.
15 हजार रुपयांना बाळ विकणाऱ्या महिलेला आता दहा महिन्यानंतर पुन्हा बाळ हवे आहे. बाळ व्याज्याच्या पैशासाठी दिले असे सांगितलं जात असताना ज्यांनी बाळ संभाळले त्यांनीही या महिलेवर आता गंभीर आरोप केलेत. पायल अभिषेक कुचेकर या महिलेने दहा महिन्यांपूर्वी वकिलाला पैसे द्यायचे आहे. मी माझ्या मुलीला विकणार असल्याची माहिती सदरबझार येथील संजय बाबर यांना सांगितले. संजय बाबर यांनी तुमची मुलगी तुम्ही दुसरीकडे न विकता मला द्या, मला दोन मुले आहेत. मला मुलगी नाही, असे म्हणून संजय यांनी पायल आणि तिचे पती अभिषेक यांना 15 हजार रुपये दिले.
पैसे घेऊन जाताना संजय यांनी या दांपत्याला पेण येथील त्यांच्या ओळखीच्या खडी क्रेशरच्या ठिकाणी कामाला पाठवले. त्यांच्याकडून साठ हजार रुपये उचल घेऊन हे कुटुंब नंतर पाच महिन्यांनंतर साताऱ्यात आले. नंतर त्यांनी संजय बाबर यांच्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात जाऊन आमचे बाळ व्याजापोटी घेतल्याचे सांगितले. जेव्हा पोलिसांनी संजय बाबरला बोलावून घेतले तेव्हा पायल आणि तिचा नवरा मोबाईल बंद करून निघून गेले. दहा महिन्यानंतर पायल पुन्हा पोलिस ठाण्यात आली असून माझे बाळ व्याजा पोटी घेतल्याचे तिचे म्हणणे आहे.
संजय यांना दोन मुलं असल्यामुळे त्यांनी ही मुलगी घेण्याचा निर्णय घेतला आणि पायलला 15 हजार रुपये दिले. त्यांनी तिचा पहिला वाढदिवसही थाटामाटात साजरा केला. मात्र अचानक पायल ही पोलिस ठाण्यात गेल्यामुळे आता बाबर कुटुंब हादरले आहे.
या सर्व प्रकाराची माहिती पायलच्या सख्या आईलाही माहिती आहे. हे बाळ माझ्या मुलीने आणि जावयानेच मला न सांगता विकल्याची कबुली दिली. शिवाय माझ्या मुलीचा आता त्या बाळावर कसलाही अधिकार नाही. ते बाळ बाबर कुटुंबालाच दिले पाहिजेत असे तिचे म्हणणे आहे.