Rain : महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, महाबळेश्वरात आद्यापही पाऊस सुरूच आहे. 


मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता काल हवामान विभागाने वर्तवली होती. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्री राज्यातील मुंबई, ठाणे पालघर आणि नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये पावसाने  हजेरी लावली.







 
दरम्यान, काल हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे. तर खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र आहे. मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 22 आणि 23 जानेवारीला मुंबई, पुण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.


शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तर रविवारी पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


महत्वाच्या बातम्या