Manoj Jarange on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) आज रविवारी (दि. 09) दोन महिने  पूर्ण झाले आहेत. पोलिसांनी (Police) या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी खळबळजनक आरोप केलाय. संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी (Dhanajay Munde) लपवून ठेवलंय, असे त्यांनी म्हटले आहे.   

जालना येथे पत्रकारांची संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तपास तर सुरू आहे आता नुसते धरू म्हणतात. अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. एक तर पळून गेलाय की धनंजय मुंडेनी लपवून ठेवलंय. प्रकरणातील दुसरा मोबाईल सापडायला तयार नाही, तो धनंजय मुंडेकडे मोबाईल देऊन गेला की काय? अजून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली नाही. जे आरोपी खुनात आणि खंडणीत करायला पाहिजे होते ते केले नाही. खंडणीतल्या आरोपीला आयसीयूमध्ये आणले जाते. मग महादेव गीतेबद्दल सरकारला आणि धनंजय मुंडेला काय वाटत नाही का? तुम्ही बाकीच्यांना सहआरोपी का करत नाही? असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. 

मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय.  मी आरक्षण मागतो म्हणून माझे पाहुणेरावळे सापडतात का? मी व्यासपीठावरून माय बापाला खाली उतरवलं, माझा मायबाप समाज आहे. देवेंद्र फडणवीस तुला वाटत असेल हा मराठा-मराठा करतोय, याचे तोंड बंद करा, याच्या जवळच्यांना नोटीसा देऊन गुंतवून द्या, पण मी थांबत नसतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.  केसेस मागे घेऊ म्हणायचं आणि नोटीसा देऊन एक-एक केसेस वाढवायच्या.  तुमचं दुसरं काय असेल तर चावून खा. पण, मराठा आंदोलन म्हणून का नोटीसा दिल्या? मराठा आंदोलक आहे म्हणून अन्याय का? मी पाहुणारावळा मानत नाही, अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करून धसांना आनंद झालाय का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करून सुरेश धस यांना आनंद झालाय का? मराठा आंदोलकांना नोटीसा द्यायच्या आणि पाहुणेरावळ्यांच्या नावाखाली माझं तोंड बंद करायचं. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणीच सत्ता स्थापन करू शकत नाही.  मला किती एकटा पाडायचा प्रयत्न कर देवेंद्र फडणवीस मी थांबत नसतो, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण