Mumbai Maghi Ganpati Visarjan 2025: माघी गणेशोत्सवात (Maghi Ganpati 2025) पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन (Mumbai Ganesh Visarjan) करू न दिल्याने मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये आणि मूर्तीकारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेनंतर मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकरांनी आता बैठक बोलावली. तसेच तातडीने सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन करू देण्याची मागणी देखील  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. 


न्यायालयाच्या निर्देशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींवर निर्बंध लादलेले असताना त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती मूर्ती गोराई येथे विसर्जनाला आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार या मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही.  त्यामुळे या पीओपीच्या उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती पुन्हा एकदा मंडपात झाकून ठेवण्यात आले आहेत. 


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार पीओपी मूर्तींवरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जनास प्रतिबंध करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. दरम्यान, कुठल्याही प्रकारे नियमावलीची किंवा त्याच्या अंमलबजावणीची मंडळाशी शिवाय मूर्तिकरांशी चर्चा न करता अशाप्रकारे पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी थांबून ठेवल्याने मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही गणेश मूर्तींचे विसर्जन कसं करायचं असा प्रश्न मुंबई महापालिका आणि प्रशासनाला मंडळांनी विचारला आहे. त्याशिवाय येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी गणेश मूर्ती संदर्भात नेमके निर्णय काय आहेत? हे स्पष्ट नसल्याने मूर्तिकारसुद्धा संभ्रमात आहेत.


नेमकं काय घडलं? (Maghi Ganpati Visarjan Mumbai)


माघी गणेशोत्सव साजरा केल्यानंतर मुंबईतील चारकोप येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पाच्या विसर्जनाकरीता तलावावरती गेले. यावेळी महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची परवानगी नाकारली. गणपती बाप्पाची मूर्ती ही पीओपीची असल्याकारणाने विसर्जन तलावात विसर्जन करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी नकार दिला. यावेळी पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मंडळाचा वाद झाला. परंतु यावेळी काहीच मार्ग निघाला नाही. यामुळे गणपती पुन्हा मंडपात घेऊन जाण्यास सांगीतले. त्यानंतर  मंडळांनी पुन्हा गणपती मंडपात आणून झाकून ठेवण्यात आले. 


संबंधित बातमी:


Manoj Jarange Patil: जालन्यात मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; मनोज जरांगेंनी विषयच संपवून टाकला, म्हणाले, माझ्या बापावर जरी...