मुंबई : आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्यात. पंचपदी अर्थात पाच भजन झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या. मग मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका विठाई बसच्या पहिल्या बाकावर विराजमान झाल्या. तर आळंदी पालखी सोहळ्याचे 20 मानकरी या बसमधून माऊलींच्या पादुका घेऊन बसमधून रवाना झाले.


जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील आज ऐतिहासिक क्षण पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पादुका या एसटीतून पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या. तत्पूर्वी पंचपदी अर्थात पाच भजन झाले अन् पादुका मंदिराच्या मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या. मग मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका विठाई बसच्या पहिल्या बाकावर विराजमान झाल्या. पारंपारिक मार्गावरूनच ही एसटी पंढरीकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान इनामदार वाडा, अनगडशाह बाबा दर्गा, चिंचोलीचं शनी मंदिर इथं आरती झाली. तर पुढे रोटी घाटात अभंग आरती पार पडेल. तिथून मात्र ही बस थेट वाखरी इथे पोहचेल. मग मानाच्या क्रमातून सर्व बस आज रात्री पंढरीत पोहचतील.


आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका आज पंढरपूरकडे रवाना झाल्या. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नाॅन एसीबसमधून पादूका पंढरपूरकडे रवाना झाल्या. यावेळी बस फुलांची सजावट करण्यात आली होती. आळंदी पालखी सोहळ्याचे 20 मानकरी या बसमधून माऊलींच्या पादुका घेऊन बसमधून रवाना झाले. यावेळी बस निघताना गजर करण्यात आला. या बसवर फुलांचा वर्षावही करण्यात आला.


Ashadhi Ekadashi 2020 | मुख्यमंत्री पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेसह पंढरपूरच्या दिशेने रवाना