नवी दिल्ली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah)  भेट घेणार आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी टीका केली आहे. एक फुल दोन हाफ हे सरकार येथे येऊन काय करणार? त्यांनी दिल्ली मुंबईचा पास काढलेला  दिसतोय, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.  आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification)  निर्णयाची मुदत 30 डिसेंबरऐवजी वाढवून देण्याची  मागणी विधिमंडळाने केली, यावर देखील संजय राऊतांनी टीका केली. विधानसभा अध्यक्ष  डमरू वाजवत बसले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.


संजय राऊत म्हणाले, राज्यातील  सरकार अस्थिर आणि घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहे. कोर्टाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष डमरू वाजवत बसले आहेत. जे निकाल देणार त्यांनीच पाच वेळा पक्षांतर केलं आहे. 


मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री संसदेची सुरक्षा पाहायला येत आहे, संजय राऊतांची टीका


मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. संजय राऊत म्हणाले,  बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहे. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कशासाठी दिल्लीला येत आहे माहित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री  बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत आहेत. बेरोजगारी, महागाईचा मुद्दा आहे. कांदा इथीनोल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत. सरकार अस्थिर आणि घटनाबाह्य आहे. त्यांनी दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसत आहे. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग?


उद्योगपती  देशाचे जावई : संजय राऊत 


धारावी पुनर्विकासासंदर्भात ठाकरे गटाच्या धडक मोर्चाचे मुंबईत बॅनर्स लागले आहेत. या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही. मात्र ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले,   जे उद्योगपती या देशाचे जावई आहेत त्यांच्या घशात घालायचा हा डाव आहे. आम्ही मोर्चा काढणारच आहे.  कारण आमचा आवाज मुंबई वाचवण्यासाठी आहे. धारावीची जनता आमच्यासोबत आहे. 


इंडिया आघाडीची बैठक 19 डिसेंबरला: संजय राऊत 


इंडिया आघाडीची ( I.N.D.I.A. Alliance Meeting) चौथी बैठक मंगळवार 19 डिसेंबर रोजी होणार आहे. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरेंनी  इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांशी दूरध्वनी वरून चर्चा झाली आहे. 


 



हे ही वाचा :