मुंबई : संदीप राऊतांना (Sandeep Raut) दिलेल्या नोटिशीचं कारण अत्यंत हास्यास्पद आहे. विरोधी पक्षातल्या लोकांना नोटिशी देणं हे भाजपचं कामच आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केली आहे. तसेच ममता बॅनर्जी इंडियासोबत नसल्या तरी, पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जिंकू देणार नाहीत, असे देखील राऊत म्हणाले. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.
कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांना ईडीचे समन्स आले या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, संदीप राऊत यांना नोटीस आली आहे मला माहिती आहे. त्यांचे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं हॉटेल वापरण्यात आलं. माझ्या मुलीने त्यांना मदत केली याविषयीची नोटीस पाठवली आहे. हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. आमची घरातील लोक जातील आणि उभे राहतील ठामपणे काय हवं ते करा.
आमच्या रक्तात शिवसेना : संजय राऊत
तुमची बायका पोरं परदेशात लंडनमध्ये राहत आहेत स्वतःचे व्हिला घेऊन कुठून आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही आमच्यावर संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आहेत लढाई आमच्याशी आहे तुम्ही आमच्याशी लढा.. आमच्या लोकांना बेकादेशीरपणे बोलवत आहेत. पिंजऱ्यात उभे करू काय हवं ते करा. हे घर डरपोक लोकांचं नाही आहे. आमच्या रक्तात शिवसेना आहे. काल रोहित पवार यांचे भाषण देखील ऐकला असेल आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. हा महाराष्ट्र स्वाभिमानी मराठी माणसांचा आहे. डरपोक लोकांचा नाही जे डरपोक लोक होती ते XX होते ते तुमच्या कळपात शिरले, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र स्वाभिमानांचा डरपोक लोकांचा नाही : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, घर डरपोक लोकांचं नाहीआमच्या रक्तात शिवसेना आहे. रोहित पवार यांचे देखील भाषण ऐकले असेल. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. हा महाराष्ट्र स्वाभिमान यांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक लोक होती ते XX होते ते तुमच्या कळपात शिरले.लाज वाटली पाहिजे तुम्हाला किशोरीताई पेडणेकर यांना तुम्ही बोलत आहात. मुंबईच्या माजी महापौरांच्या चार-पाच लाखाच्या व्यवहारासाठी कसला हिशोब करत आहात, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
तुमच्या नोटीसला घाबरत नाही : संजय राऊत
8000 कोटीचा ॲम्बुलन्स घोटाळा समोर आला आहे. आय एन एस घोटाळा 38 कोटी रुपये या XXX पोपटलालने गोळा केले. 38 कोटी रुपये गोळा केले. आय एन एस घोटाळा प्रकरणी क्राउड फंडिंग अशा ग्राउंड फंडिंग प्रकरणी अनेकांना अटक केली आहे.साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार यांना 500 रुपये क्राउड फंडिंग केला म्हणून अटक केली. आयएनएस विक्रांत बचावसाठी किरीट सोमय्या याने कोट्यावधी रुपये गोळा केले.आम्ही जी प्रकरण काढलं होतं. आमच्या सरकारने गुन्हा दाखल केला होता. तो तुम्ही रद्द केला आणि आम्हाला नोटीस पाठवता. आम्ही तुमच्या नोटीसला घाबरत नाही.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे करणार : संजय राऊत
आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत आहेत. त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असेल तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहेत. जागा वाटपाचा तिढा हा पहिल्यापासून आहे. आज आमची काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली आणि त्यासंदर्भात ममता जी यांच्याशी बोलतील. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे पराभव होईल त्याच पद्धतीने पंजाबमध्ये आप प्रकार आहे आणि खासदार काँग्रेसचे आहेत पण काय झालं तरी भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल आणि इंडिया आघाडीमध्ये आहे