मुंबई : चार राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result)  जाहीर झाला. या निकालात तीन राज्यांमध्ये भाजपला (BJP)  यश मिळालं. तर एका राज्यात काँग्रेसला समाधान मानावं लागलंय. तसंच काल झालेल्या या चुरशीच्या लढतीवरुन कालचा निकाल हा   Evm च्या माध्यमातून लागलाय आणि हा निकाल आम्ही स्वीकारतो अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी दिलीय. तर त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर दिलंय. तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालंय. त्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी तेलंगणामध्ये ईव्हीएम ची कमाल आहे का?  असा सवाल राऊतांना केलाय.


संजय राऊत म्हणाले, चार राज्यातील निकाल आले आहे.  आम्ही लोकशाही मानणारे आहोत. Evm च्या माध्यमातून कालचा  निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयाने लोकं शॉक आहेत. जो काही निर्णय येतो त्याला मान्य केलं पाहिजे . ईव्हीएमने निकाल दिला असला तरी ईव्हीएमचा जनादेश आहे. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी evm बद्दल इंडियाचा मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केला होत.लोकांच्या मनात अशा  शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी.  एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. 


चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान : नितेश राणे


चार राज्याचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्का मोर्तब झालं आहे.आमचे विरोधक शेमड्यासारखे रडत आहेत. ईव्हीएमची कमाल असल्याचे राऊत म्हणाले तेलगंणामध्ये ईव्हीएमची कमाल आहे का? असा सवाल नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे.  तिकडे दिग्विजय इकडे राऊत भुंकत आहेत.  महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली असे महिलांबाबात संजय राऊतने वक्तव्य केले.  त्यामुळे चार राज्यातील महिला भगिनींचा अपमान झाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.


महाराष्ट्रात फक्त महाविकाआघाडीची मॅजिक चालणर : राऊत 


जगात अनेक जण हरलेत कोणीही माजू नये. या निकालानंतर  कोणाचा माज वाढला हा त्यांचा प्रश्न आहे. भाजप हा गरज सरो वैद्य मरो असा आहे. आम्ही सत्ता भोगली आहे.  आम्ही लढू आम्ही जिंकू. महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवार आणि मविआची मॅजिक चालणार आहे. या देशात सगळं मॅनेज होतंय, तर evm झाले त्यात  नवल काय? असे देखील राऊत म्हणाले. 


हे ही वाचा :


बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? कार्यकर्ते म्हणाले, फडणवीस