Maratha Reservation Update : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मराठवाड्यातून (Marathwada) मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य शासनाच्या आदेशावरून विविध विभागाने मराठवाड्यात त्यांच्याकडे असलेल्या जवळपास जुन्या 2 कोटी कागदपत्रांची तपासणी केली असून, यामध्ये 27 हजार 534 कुणबी नोंदी (Kunbi Records) आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक 13 हजार 128 नोंदी एकट्या बीड जिल्ह्यात आढळून आले आहे. तर, तपासणीत आढळलेल्या नोंदीचा सविस्तर अंतिम अहवाल शिंदे समितीकडे सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी या नोंदी महत्वाच्या ठरणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे1.
कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी आढळल्या
छत्रपती संभाजीनगर
2447887 कागदपत्रांची तपासणी
1278 नोंदी आढळल्या
जालना
2160615 कागदपत्रांची तपासणी
3318 नोंदी आढळल्या
परभणी
2119994 कागदपत्रांची तपासणी
2891 नोंदी आढळल्या
हिंगोली
1262219 कागदपत्रांची तपासणी
3468 नोंदी आढळल्या
नांदेड
2568942 कागदपत्रांची तपासणी
1204 नोंदी आढळल्या
बीड
2381553 कागदपत्रांची तपासणी
13128 नोंदी आढळल्या
लातूर
2264493 कागदपत्रांची तपासणी
809 नोंदी आढळल्या
धाराशिव
4185029 कागदपत्रांची तपासणी
1438 नोंदी आढळल्या
सरसकट आरक्षणाची मागणी...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभरात सभा घेण्यात येत आहे. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निजामकालीन नोंदी शोधल्या जात असून, राज्यभरात आतापर्यंत अनेक नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात देखील सर्वच आठ जिल्ह्यात नोंदी शोधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रशासनाकडून कुणबी प्रमाणपत्र देखील दिले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही: गिरीश महाजन
एकीकडे मराठा समाजाकडून सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी होत असतानाच, दुसरीकडे भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येते माध्यमांशी संवाद साधतांना महाजन म्हणाले की, "मराठा आरक्षण प्रकरणी सरकार गंभीर आहे. य संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहे. मनोज जरांगेंचीची सरसकट प्रमाणपत्र मिळावे ही मागणी शक्य नाही. मी स्वत: ज्यावेळी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळी मी त्यांना या संदर्भात सांगितले आहे. आतापर्यंत जेवढ्या कुणबी नोंदी मिळल्या त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार कसं? असा सवाल देखील महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या: