भंडारा: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला आहे. कारण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न बावनकुळेंनी भंडाऱ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारला. त्यानंतर 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. त्यामुळे एकीकडे महायुती आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) नेतृत्त्वात लढणार असं भाजपने सांगितलं होतं. आता बावनकुळेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांनाच उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला.
महाराष्ट्रात आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी लढेल अशी घोषणा एकीकडं भाजपकडून यापूर्वी करण्यात आली आहे. असं असताना काल रात्री भंडाऱ्यातील लाखनी इथं भाजपकडून घेण्यात आलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या अनुषंगानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोणी शपथ घेतली होती? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली.
खरं तर, बावनकुळे यांनीचं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत थेट देवेंद्र फडणवीस यांनाचं उतरवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तीन संकल्प दिला. त्यात मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे असून भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचा आहे. दुसरा संकल्प वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आगामी नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत भाजप ज्या उमेदवारांना AB फॉर्म देणार त्या सर्वांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या तिन्ही संकल्पासाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षासाठी 3 तास 13 महिने मागितलेत. यावेळी बावनकुळे यांनी, महाराष्ट्रात एकच वाघ असून ते देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करत फडणवीस एकच वाघ असून दुसरा कोणीही वाघ होऊ शकत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांचं नावं नं घेता लगावला.
हे ही वाचा :