Sanjay Raut On Gujarat Election : गुजरातमध्ये (Gujarat Election 2022) भाजपच्या (BJP) प्रचारावर बोट ठेवत संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि केंद्रीय मंत्री गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र निवडणुक यंत्रणेवर विश्वास नाही अशी लोकांची भावना असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणूक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले.


 


मशीन गडबड करून किती गडबड करणार


गुजरात निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी त्यांचा बराचशा वेळ गुजरातला दिला आहे, पंतप्रधान मोदी हे 3 वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी मोदींना मेहनत घ्यावी लागतेय. तसेच भाजपने कुठल्याही प्रचाराशिवाय गुजरात निवडणूक जिंकायला हवी असे राऊत म्हणाले. तसेच लोकं असे म्हणतात, निवडणूक यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, म्हणजेच सरकारच्या विरुद्ध लोकांची भावना असली तरी भाजपचे उमेदवार जिंकतील असं होणार नाही. मशीन गडबड करून किती गडबड करणार, वेट अॅंड वॉचची भूमिका घेणे योग्य आहे. 


 गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान


आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे.  दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.


'शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी का खेळता?'
महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंनी किमान कर्नाटक-बेळगाव सीमारेषेला स्पर्श तरी करावा असं राऊत म्हणाले. बाकी तुम्हाला काय कबड्डी खेळायचे असेल ते इथे खेळा. पण हे लाचार लोकं आहेत, असं वक्तव्य करत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराज कोकणात जन्मले असं प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं होतं. यावर शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी का खेळता? संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे. भाजपला शिवरायांचा इतिहास का बदलायचा आहे? असा सवाल करत राऊतांनी टीका केलीय.


राज्यपालांवर कारवाई करावीच लागणार - राऊत


राज्यपालांवर कारवाई करावीच लागणार, आशिष शेलारांना सांगा, आधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असं वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा की, का रे शिवरायांचा अपमान करता? का रे तुम्ही छत्रपतींची बदनामी करता?  पण भाजप नेत्यांच्या मनगटात तेवढी हिंमत नाही. भाजपनं शिवनेरीवर फुली मारली आहे. असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Gujrat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात