मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा लक्षद्वीपच्या दौऱ्यावर सध्या चर्चेत आहे.  तिथं त्यांनी समुद्र किनाऱ्यावरचा एक व्हीडिओ पोस्ट केला. त्यावर मालदीव (Maldives) सरकारच्या मंत्र्यांनी अत्यंत खालच्या भाषेचा वापर करत टीका केली. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याचा निषेध केला आहे. पंतप्रधानांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील तर त्याचा निषेध, असे संजय राऊत म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले, देशाच्या पंतप्रधानाबाबद कुणी अपशब्द वापरल्यास त्याचा निषेध करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महान देशाचे पंतप्रधान आहे. पंतप्रधानांबद्दल कोणी अपशब्द वापरले तर भारताचा नागरिक म्हणून आम्हाला मान्य नाही. पंतप्रधानांशी आमचे राजकीय मतभेद आहेत. पण जर कोणी अपमान करणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. 


मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील : राऊत


महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात संजय राऊत म्हणाले,  आम्ही कायम  23 जागा लढवल्या आहेत.  मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील. काही मतभेद झाल्यास राहुल गांधी, उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करु. देशात सुरु असणाऱ्या हुकूमशाही विरोधात हा आमचा लढा आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वा खाली 48 जागांची चाचपणी करून 23 जागा आम्ही निवडल्या आहेत. 2024  ला पंतप्रधान पदाचा नवीन उमेद्वार तुम्हाला दिसणार आहे. 


काँग्रेस जिथे आहे तिथे शिवसेना लढणार नाही: संजय राऊत 


 आज जागावाटपावर बैठक आहे. जागांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत गोंधळ होण्याची शक्यता नाही.  काँगेस जिथे आहे तिथे शिवसेना लढणार नाही. काँगेसचे नेतेही दिल्लीत येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतेही आज दिल्लीला येतील, असं दिसतंय. महाराष्ट्रात 48 जागा आहेत.  मोठी राज्य महत्वाची आहेत  


काय आहे प्रकरण?


पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी समुद्र किनाऱ्यावरचा एक व्हीडिओ पोस्ट केला. त्यावर मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी अत्यंत खालच्या भाषेचा वापर करत टीका केला.  वाचाळवीरांनी भारताचा अपमान केल आणि भारतीयांनी त्याला थेट आपल्या स्वाभिमानाशी जोडला.. आणि देशात सुरु झाला बायकॉट मालदीव्जचा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण नेमकं त्याचमुळे आता मालदीवची कोंडी होण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा :


Maldives Vs Lakshadweep : भारत मालदीवची कोंडी करणार? भारतीय पर्यटकांच्या बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था संकटात? जाणून घ्या काय सांगते आकडेवारी