Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृहखात्यात नाही. कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षेकडेही नसून ते पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यामध्ये संपूर्ण पोलिस खातं अडकून ठेवल्यामुळे या घटना घडत आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डाॅक्टर युवतीच्या आत्महत्येवरून हल्लाबोल केला. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टरने पीएसआयवर अत्याचार केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. तसेच रुग्णालयातही रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याने...
संजय राऊत म्हणाले की, काल आपण दोन घटना पाहिल्या. फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. तिला आत्महत्या करावी लागली, तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यात आहेत. या घटनेमुळे भय कसं नष्ट झालय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजली आहे हे स्पष्ट झालं. पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याने फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील.
गृह खातं अजगराप्रमाणे निपचित पडलं आहे
त्यांनी पुढे सांगितले की, गृह खातं विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणे, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं हे करत असून गृहखात अजगराप्रमाणे निपचिप पडलं आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही, सरकार काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाह. या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करण्याऐवजी पोलिस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबवलं जात आहे.
महिला पोलिस महासंचालक असूनही...
राऊत म्हणाले की, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी महिला अधिकारी असूनही (ज्यांना देवेंद्र फडणवीस एक्सटेन्शन देत आहेत), महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर आता भारतीय जनता पक्षातील त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या? हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वान महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केलं असतं. आता या सगळी गप्प का आहेत कसली वाट पाहता? अशी विचारणा त्यांनी केली. घटना घडल्यावर चौकशीचे आदेश, निलंबनाचे आदेश, कठोर कारवाईचे आदेश सुरु आहे, पण या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातील घटनांचं काय झालं? कुठपर्यंत तपास आला याविषयी जर तपशील मागितला तर शून्य असल्याची टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या