Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यातील वाद वाढतच असल्याचं चित्र आहे. जैन बोर्डिंगच्या जागेवरून रविंद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर (Murlidhar Mohol) टीकेची झोड उठवली होती. अशातच मोहोळ यांनी सर्व गोष्टींवरती स्पष्टीकरण दिलं तरीदेखील धंगेरकरांनी पुन्हा एकदा मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर निशाणा साधला, तर मोहोळ यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना दिलेल्या उत्तरानंतर (Pune Politics) धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Dhangekar on Mohol)
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : पुरावे दाखवा आणि मग बातमी दाखवा
मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, रोज सकाळी तुम्ही तिथे जाता, ते बोगस ट्विट करतात आणि तुम्ही ते दाखवता. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. व्यक्तिगत दोष, आकास यामधून हे बोललं जात आहे. बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा, कागद दाखवा, पुरावे दाखवा आणि मग बातमी दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही नाही, त्यांना काय काम धंदा नाही असं म्हटलं होतं, त्यावर आता पुराव्यांसह धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी दिली आहे.
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : अगदी ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल
धंगेकरांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात..!
मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे, बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात..!
Ravindra Dhangekar vs Murlidhar Mohol : काय म्हणाले होते मुरलीधर मोहोळ?
मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, रोज सकाळी तुम्ही तिथे जाता, ते बोगस ट्विट करतात आणि तुम्ही ते दाखवता. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. महापालिकेची गाडी मी वापरली नाही, लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रामध्ये मी दिलं आहे की मी स्वतःचे इंथन, स्वतःची गाडी वापरली. पुण्याला एक स्वतःची गाडी वापरणारा महापौर मिळाला होता,व्यक्तिगत दोष, आकास यामधून हे बोललं जात आहे. बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा, कागद दाखवा, पुरावे दाखवा आणि मग बातमी दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही नाही, त्यांना काय काम धंदा नाही असं म्हटलं होतं, त्यावर आता पुराव्यांसह धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी दिली आहे.