Sanjay Shirsat: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. राजकीय नेत्यांच्या गाडीवर हल्ले होत आहे, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना मराठी माणसांमध्ये भांडण लावून हे अब्दाली लोक मजा घेत आहेत असं शिवसेना ठाकरे गटाते नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर बोलतना शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत (Sanjay Raut)मराठी राहिले आहेत का असा सवाल उपस्थित करत जहरी टीका केली आहे.
संजय राऊतांची कधीच सुंता झालेली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) कसले मराठी आहेत तेव्हा, त्यांना मराठी म्हणायचा अधिकार तरी प्रप्त आहेत का? तो कोणाबद्दल बोलत आहे, भाषणामध्ये टाळ्यांसाठी काहीही बोललेलं चालतं, पंरतु जनतेला माहिती आहे, तुमची औकाद काय आहे, तुम्ही काय होता, काय करता आणि काय करत आहात, एका गोष्टीबद्दल त्यांना मानायला पाहिजे, पक्ष डुबवायचा असेल तर संजय राऊतला (Sanjay Raut) पक्षप्रवेश द्या असं म्हणत राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावेळी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
ठाण्यात जो प्रकार घडला तेथील लोक दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचे लोक होते. महाराष्ट्रात गोंधळ करण्यासाठी त्यांना सुपारी देण्यात आली होती, ती सुपारी ठाण्यात वाजली. अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या देऊन दिल्लीतून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या गोंधळाची मजा पाहत बसलाय. विधानसभा निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडणारच. मी इकडे कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. कारण जे काही चाललंय ते दिल्लीतून अहमदशाह अब्दालीने दिलेल्या सुपारीवरुन चाललंय. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना काही कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. त्यानुसार हे नेते काम करत आहेत, असे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता सांगितले.
दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं. नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या (MNS) रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले आहे.