मुंबई: शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले, पातळी सोडून त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले त्यावेळी हे सर्वजण कुठे होते असा सवाल खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना विचारला आहे. 2014 साली युती ही भाजपने तोडली, 2019 साली युतीही भाजपनेच तोडली, बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द त्यांनी फिरवला असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
खासदार राहुल शेवाळे यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज उत्तरं दिली. संजय राऊत म्हणाले की, आम्ही वाईट काळातही पक्षासोबत राहिलो. दबाव असतानाही आम्ही पक्ष सोडलो नाही. मोदी- ठाकरे यांच्या भेटीबाबत आम्हालाही माहिती होतं. मुळात युतीवर जर प्रश्न निर्माण करत असतील तर 2014 साली आपण कुठे होता? भाजपने युती तोडली त्यावेळी तुम्ही कुठे होता? भाजपच्या भूमिकेवर यांनी प्रश्न का विचारला नाही? 2014 साली युती ही भाजपने तोडली आणि 2019 साली युती ही भाजपमुळेच तुटली.
युतीचा शब्द पाळला गेला असता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच झाले असते हे सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांची फसवणूक भाजपनेच केली असल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, 2019 साली युतीत असतानाही मुख्यमंत्रीपदाचा शब्द भाजपने फिरवला. भाजपने ही वेळ आपल्यावर आणली आहे, बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द पाळला जात नसेल तर भाजपला धडा शिकवण्याची हीच संधी आहे अशी चर्चा झाली. त्यावेळी या सर्वांनी पाठिंबा दिला होता. आता या लोकांनी त्याच्या विरोधात भूमिका घेतली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Shivsena-BJP : उद्धव ठाकरे भाजपसोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार राहुल शेवाळे यांचे गौप्यस्फोट
- मी माझ्या परीने युतीसाठी प्रयत्न केले, आता तुम्ही तुमच्या पातळीवर करा, शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीसाठी दिला होता ग्रीन सिग्नल; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट
- Shivsena BJP : भावना गवळींचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच: राहुल शेवाळे