Maharashtra Cabinet Expansion : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यावेळी 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात संजय राठोड (Sanjay Rathod) यांना स्थान देण्यात आलं. संजय राठोड यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, 'जय राठोड यांना क्लिनचीट मिळाल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.' संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 


राठोड यांना क्लिनचीन मिळाल्याने मंत्रिमंडळात स्थान


पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यामुळे राठोड यांचं मंत्रिपदंही गेलं होतं. दरम्यान मागील सरकारच्या काळात संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिनचन दिली आहे. त्यानंतर आता त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिपद मिळालं आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधत तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.


शहानिशा करुन नंतरच राठोड यांना मंत्रिपद दिलं


नव्या मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'संजय राठोड यांना क्लिनचीट मिळाल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी संजय राठोड यांनी क्लिनचीट दिली आहे. त्याची शहानिशा करुन नंतरच राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. यानंतरही इतरांचं काही मत असेल, काही विचार असतील किंवा कुणाची प्रतिक्रिया असेल तर ती ऐकून घेतली जाईल.'


'याबाबत इतरांचं काही मत असलं तर ऐकून घेतलं जाईल'


मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, 'लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात राठोड यांच्या विरोधात काही निष्पन्न न झाल्यानं त्यांना क्लिनचीट देण्यात आली. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. याबाबत इतरांचं काही मत असलं तर ऐकून घेतलं जाईल.' दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे.  सर्व लोकांना सर्व घटकांना न्याय मिळणार आहे. सर्वसामान्यांचा सरकार काम करुन विरोधकांना उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या