Supriya Sule on Cabinet Expansion : आज अखेर रखडलेला  शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. यामध्ये एकूण 18 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 9 तर शिंदे गटाच्या 9 जणांना मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. तसेच हे खेदजनक असल्याचे सुळे यांनी म्हटलंय.


नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे


स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


 






गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रीमंडळाचा अखेर विस्तार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांनी संधी देण्यात आली आहे. शिंदे सरकारमधील 18 नव्या मंत्र्यांनी आज शपथ घेतली. भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.


मंत्रिपदी वर्णी लागलेले नेते 



शिंदे गटातील मंत्री 



  • तानाजी सावंत (Tanaji Sawant)

  • उदय सामंत (Uday Samant)

  • संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)

  • दादा भुसे (Dada Bhuse)

  • अब्दुल सत्तार (Abdul Sattar)

  • दीपक केसरकर (Deepak Kesarkar)

  • शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

  • संजय राठोड (Sanjay Rathod)

  • गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)


भाजपकडून मंत्री



  • गिरीश महाजन (Girish Mahajan)

  • चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

  • सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)

  • सुरेश खाडे (Suresh Khade)

  • राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)

  • अतुल सावे (Atul Save)

  • रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)

  • विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

  • मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)


महत्त्वाच्या बातम्या: