सांगली : अवैध गर्भपात प्रकरणी सांगलीतील चौगुले हॉस्पिटल सील करण्यात आले असून, तीन डॉक्टरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने छापा टाकून हे प्रकरण उघडकीस आणलं.
चौगुले हॉस्पिटलमध्ये या छाप्यात संशयास्पद कागदपत्रे आणि औषधेही जप्त करण्यात आली असून, गर्भपाताची सामग्री सुद्धा सापडली आहेत. गर्भपाताचे किट आणि दारुच्या बाटल्याही सापडल्या.
स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यात हॉस्पिटलमधून संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही हॉस्पिटलमध्ये सापडल्या आहेत.
तसेच, हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे आतापर्यत समोर आलेले आहे. आणखी किती अवैध गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरासह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हे दाखलन करण्यात आले असून स्वप्नील जमदाडे, विजयकुमार चौगुले, रुपाली चौगुले अशी डॉक्टरांची नावे आहेत.
दरम्यान हॉस्पिटलची तपासणी सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
अवैध गर्भपात प्रकरण : तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, हॉस्पिटल सील
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2018 10:59 PM (IST)
या छाप्यात चौगुले हॉस्पिटलमधून संशयास्पद कागदपत्रे आणि औषधेही जप्त करण्यात आली असून, गर्भपाताची सामग्री सुद्धा सापडली आहेत. गर्भपाताचे किट आणि दारुच्या बाटल्याही सापडल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -