सांगली/जळगाव : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 57 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.


सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 60 टक्के मतदान झाले. जळगाव महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 55 टक्के मतदान झाले.
चारऐवजी तीनच बटणं दाबली, मतदाराच्या कारनाम्यामुळे निवडणुकीचा खोळंबा

एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेसाठी  सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया झाली.
सांगलीत काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबूनही मतदान भाजपला?

दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार होते. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

सांगली- मिरज- कुपवाड महापालिका

एकूण प्रभाग - 20
जागा - 78
उमेदवार - 451
मतदार - 4 लाख 24 हजार 179
मतदान केंद्रे - 544

जळगाव महापालिका

एकूण प्रभाग - 19
जागा - 75
उमेदवार - 303
मतदार - 3 लाख 65 हजार 72
मतदान केंद्रे  - 469

सांगली78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात

काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम - 8

संबंधित बातम्या 

सांगली महापालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?  

ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा  

रणसंग्राम महापालिकेचा : जळगावकरांसमोरचा नवा पर्याय कोणता? थेट जळगावातून  

जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!