Sangli News:  सांगली (Sangli) जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे.  सांगलीतील अनेक तालुक्यात पेरणी झाली नाही आणि जिथे पेरणी झालीय त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत (Jat) तालुक्यात तर अजिबातच पाऊस पडला नाही. त्यामुळे  जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचं चित्र सध्या आहे.  


दुसरीकडे शेतीला देखील पाणी नसल्याने आणि वरुणराजा कृपावृष्टी न झाल्याने जत तालुक्यावरील दुष्काळाचं संकट अधिकच गडद होत चाललं आहे. ज्या कृष्णा नदीची पाणी पातळी जुलैमध्ये  20 फुटाच्या आसपास असते तिथे सध्या कृष्णा नदी पाणी पातळी  अवघ्या 6 ते 7 फुटावर आली आहे. यामध्ये  दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच गडद बनत चालली आहे.


आता जत तालुक्यावर  दुष्काळाचे काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत. कारण आतापर्यंत तालुक्यात फक्त 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृष्णा नदीतून कर्नाटकात जाणारे  पाणी जत तालुक्यातील पाणी नसलेल्या गावांना द्यावं, ही मागणी  जोर धरत आहे. त्याचप्रमाणे जत येथील म्हैसाळच्या सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि जत तालुक्यात चारा छावण्या आणि टँकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक मागण्या करण्यात येत आहे. त्यासाठी नागरीकांकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. 


सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच जत,आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रामुख्याने कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतली जातात.परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणी देखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने  खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची उगवण खूंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यात आहे. 


दुसरीकडे कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज या पूर्वेकडील तालुक्यात देखील भीषण परिस्थिती काही दिवसात निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच जर 15 जुलै नंतरही समाधानकारक पाऊस पडला नाही तर जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे.


पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही सूचना पालकमंत्री सुरेश खाडे  जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्याच्या घडीला 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होत आहे. तसेच सीमेवरील आठ गावातील वाड्या वस्त्यांमध्ये  सोमवारपासून पासून टँकर सुरू करण्यात येणार आहेत.


या सगळया भागावर प्रशासन लक्ष ठेवून असून 15 जुलै नंतर देखील पाऊस पडला नाही तर प्रामुख्याने जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्या 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होऊ लागली असून यातील सीमेवरील  8 गावातील वाड्या-वस्त्यांवर  सोमवारपासून पासून टँकर सुरू करण्यात येणार आहेत.


हे ही वाचा : 


IMD Rain Update : राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार