सांगली : राज्याच्या राजकारणात (State Govt.) जिल्हा बँकेच्या निवडणूकांचेही (District Bank Election) बरेच महत्त्व असते. त्यात पश्चिम महाराष्ट्रात या निवडणूका चांगल्याच गाजतात. दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Sangli District Bank) निकालही समोर आले आहेत. यावेळी अध्यक्षपदी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बँकेच्या इतिहासांत पहिल्यांदाच महिला संचालकांना हा बहुमान मिळणार आहे. या निवडीनंतर सांगलीत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने निवडण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी जिल्हा बँकेचा परिसर गजबजून गेला होता.
महाविकास आघाडीचा एकहाती विजय
जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होऊन 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाआघाडीच्या सहकार पॅनेलने 16 तर भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलने 4 जागांवर विजय मिळवला. महाआघाडीची सत्ता आल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदावर आमदार मानसिंगराव नाईक यांचा प्रबळ दावा होता. त्यामुळे त्यांची निवड ही निश्चितच होती. त्यानुसार बिनविरोधपणे अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक आणि उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याआधी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. त्याठिकाणीही राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदावर श्याम सोनवणेंच्या (Shyam Sonawane) नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
- सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचंय?; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर कडाडल्या
- राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाच्या अध्यादेशाला निवडणुकीच्या तोंडावर स्थगिती
- OBC Reservation : राज्य सरकारकडून ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha