मुंबई :  राज्यातील जवळपास एसटी महामंडळाचे 100 डेपो सुरू झाले आहे.   राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच  दर महिन्याच्या 10 तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार नियमित कामांवर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या होणार आहे.


मेस्मा लावायचा की नाही यावर कॅबिनेटमध्ये चर्चा


राज्य सरकार सध्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबतचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे.  सोबतच मेस्मा लावल्यानं काय परिणाम होणार यावरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे.


सोमवारी 245 कर्मचाऱ्यांचे निलंबन


सोमवारी 6 डिसेंबर रोजी संपात सहभागी असलेल्या 245 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. सोमवारी (6 डिसेंबर) आलेल्या आकडेवारीनुसार कालपर्यंत 9625 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर 1990 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. 


जाणून घ्या Mesma Act म्हणजे काय?


 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आता 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी Mesma लावण्यात येतो. केंद्र सरकारने हा कायदा 1968 साली अंमलात आणला होता. त्यानंतर राज्यांनाही हा कायदा अंमलात आणण्याचे अधिकार मिळाले होते.  अत्यावश्यक सेवा पुरणाऱ्या लोकांनी संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :


एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यान्वये होणार कारवाई; जाणून घ्या Mesma Act म्हणजे काय?


ST Strike : संपकऱ्यांना धक्का; सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना एसटीची दारे बंद?


पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?