याशीवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत. त्यामुळे एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर, राज्यभर प्रकाशझोतात आलेला हा कोंबडा आता लवकरच चित्रपटात पाहायला मिळेल, असे दिसतेय.
खानापूर तालुक्यातील आळसंद गावातील 'अण्णा' म्हणून ओरडणारा कोंबडा लाखो लोकांनी एबीपी माझावर पाहिला.
या कोंबड्याच्या बातमीवरुन सोशल मीडियावर जोक्स देखील सुरू झाले. पण आता कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकमधील एका दिग्दर्शकांने चित्रपटाची ऑफर दिली आहे. याशिवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत.
ही सगळी मंडळी आळसंद गावात येऊन त्या अण्णांची भेटदेखील घेऊन गेले आहेत. कोंबडा विकण्यास नकार देत असलेल्या अण्णांनी, चित्रपटाची ऑफर मात्र स्वीकारली.
एबीपी माझावर हा कोंबडा पाहिल्यानंतर तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून अनेक लोकांनी गावात जाऊन हा कोंबडा पहिला. अनेक हौशी लोकांनी लाखो रुपये देऊन हा कोंबडा विकत घेण्याचे आमिष दाखवले. पण अण्णांनी यास नकार दिला.
एका कोंबड्यामुळे आपल्या गावचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने, आळसंद गावातील नागरिकदेखील या कोंबड्यावर खुश आहेत.
VIDEO: