Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा (Samruddhi Mahamarg Mumbai Nagpur Expressway) आजपासून सुरू होणार आहे. शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. 


याआधी नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते, त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम (Samruddhi Mahamarg Second Phase) सुरू होते. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 


मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.  शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.


शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.  मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर 2022 ला नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा 80 किमीच्या महामार्गाचे काम देखील झाले आहे.


मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत?


शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल. सध्या शिर्डीपर्यंत जुन्या महामार्गानंच जावं लागतं, ज्यासाठी अडीच ते चार तास लागतात. 


पुढल्या वर्षी, म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची चर्चा आहे. 


हेही वाचा:


Jejuri : जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी