मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. राज्यात इतिहास संशोधकांपासून ते सर्वसामान्य शिवभक्तांपर्यंत शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती  (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पुन्हा सरकावर सडकून टीका केली असून वाऱ्यामुळे शिवरायांचा पुतळा पडला असल्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वक्तव्यांवर ही संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला आहे.


न बोलणारे लोक आता गड किल्ल्यावर बोलयाला लागले, हे शाॅकींग


शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवला होता, तो मुळात शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवला नव्हता हे मी आधीच सांगितले होते. याबाबतचे पूर्ण काम करावे आणि पुतळा बदलावा हे मी 12 डिसेंबरला सांगितले होते. पण घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. त्यामुळे लोक आपली भावना व्यक्त करणारच आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले उत्तर हे काय उत्तर नाही. वाऱ्यामुळे पुतळा पडत असेल तर याचा आधी विचार करायला हवा होता. यात घाई गडबडीने निर्णय घेतले आहेत.


अटींचा सखोल अभ्यास करायला हवा होता. मात्र, यात केवळ राजकारण व्हायला लागलं आहे, त्यात काय दुमत नाही. मात्र आधी न बोलणारे लोक आता गड किल्ल्यावर बोलयाला लागले. हे 'शाॅकींग' आहे, पण याचा आनंदही आहे की लोक बोलायला लागलेत. मात्र जे घडायला नको होतं तेच घडलं आहे. गावातसुद्धा पुतळा उभारायचा असेल तर त्याला खुप अटी असतात. त्यामुळे या प्रकरणातील जाचक अटींचे पालन झाल का? कला संचालयाने परवानगी दिली होती का? राजकारण बाजूला ठेवावे, महाराजांच्या बाबतीत आदर प्रत्येकाला यात दुमत कोणाचे नाही. पण या चुका का होतात? आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुढे विचार कराला हवा. पुन्हा एक चांगलं स्मारक कस करता येईल, हे बघितले पाहिजे. असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.


निवडणुकांमुळे नुसतं काहीतरी करावं हे सरकाने करु नये - संभाजीराजे छत्रपती   


पंतप्रधान मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केल होते. नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महारांजाना म्हटले जाते. त्यामुळे हे स्मारक अजून चांगले होणे गरजेचे आहे. सरकारने ताबडतोब पाऊल उचलायला हवेत. मला पण इच्छा होती की राजकोट ला जाऊन तिथे भेट द्यावी, पण भेट देऊन काय होणार, मुंबईत बैठक जास्त व्हायला पाहिजे. निवडणुकांमुळे नुसतं काहीतरी करावं हे सरकाने करु नये. कारवाई करा, पण जाचक अटींच पालन का करत नाही. पॅरामीटर आपण का पाळत नाही? या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यात प्रश्न नाही. पण या पुढे कस करणार यावर चर्चा करा, असेही  संभाजीराजे छत्रपती म्हणाले.


आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल


मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू परखड व्यक्तीमत्व आहेत. आम्ही एकत्र यायला लागलोय, चर्चा सुरु आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी चर्चा सुरु झाली आहे. मनोज जरांगे यांची पण भेट घेतली असून सकारात्मक चर्चा झालीय. महाराष्ट्राला एक चांगला पर्याय, आपण सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. मी कोणाच्या सोबत नव्हतो. सगळ्यांसाठी आमची दार उघडी आहेत. काॅमन मिनिमम अजेंडा घेऊन आमच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री?


झालेली घटना दुर्दैवी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नेव्हीने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केलं होतं. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,45 किमी पर अवर असा वारा होता, त्यात हे नुकसान झालं आहे. उद्या त्याठिकाण नेव्हीचे अधिकारी येणार आहेत. तात्काळ आमचे आणि नेहमीच अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्याचं काम आम्ही करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. तसेच, कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे म्हणत वैभव नाईक यांच्या तोडफोडीवर भाष्य केलंय.  


आणखी वाचा 


Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ठाण्यातील जयदीप आपटे नेमका कोण?