उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळालीतील अक्षय शहाजी देवकर या मुलाला 94 टक्के गुण मिळून देखील त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. दहावीला 94 टक्के गुण घेऊनही मराठा असल्यामुळे चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळाले नाही. या घटनेचा दाखला देत छत्रपती संभाजीराजे यांनी पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे.
समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील नेते असोत किंवा विरोधी पक्षतील. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय?, असे सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहेत.
भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्या प्रकारचं आहे का? की उगाच 'मुह में राम, बगल में सूरी' असा प्रकार चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. नाहीतर आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती, असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्यामुळे आपलं आज जीवंत आहोत सुरक्षित आहे ते शेतकरी. या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वतःला संपवत आहेत, असा सवालही छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, मला वाटतंय की आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष आहे. मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे आहेत.
यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे. केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते, म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षच नाही असं समजू नका. 'शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते. ते आजही तंतोतंत खरे आहे, असा अप्रत्यक्ष इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी नेत्यांसह प्रशासनाला दिला आहे.
संबंधित बातम्या
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचं विधेयक विधानसभेत मंजूर
मराठा आरक्षण कायदा झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत जाईल : हर्षवर्धन जाधव
मराठा आरक्षण : पीजी मेडिकल प्रवेशाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मराठा आरक्षण : समाजाला आरक्षणाची गरज राहणार नाही तेव्हा मराठ्यांऐवजी इतर जातीचा समावेश