- 10 हजाराचा जीआर तात्काळ रद्द करा
- 'थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या' नावातून 'थकीत' शब्द काढून 'सरसकट' शब्द वापरावा
- पीक कर्जासह इतर शेतीपूरक कर्जमाफीसाठी सुकाणू समिती आग्रह
शेतकरी कर्जाबाबतचा जीआर तातडीने रद्द करा: सुकाणू समिती
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 03:14 PM (IST)
मुंबई: शेतकरी संपानंतर स्थापन झालेल्या सुकाणू समितीची आज बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांवर एकमत झालं. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तातडीच्या दहा हजाराच्या कर्जाबाबत राज्य सरकारने जो जीआर काढला आहे, तो तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीने केली. याशिवाय 'थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या' नावातून 'थकीत' शब्द काढून 'सरसकट' शब्द वापरावा, अशाही मागणी करण्यात आली आहे. सुकाणू समितीच्या मागण्या