बीड : साईबाबांच्या जन्मस्थानावरून वाद पाथरी विरुद्ध शिर्डीकरांचा वाद सुरू झाल्यानंतर आता साईबाबा कुठे कुठे वास्तव्यास होते याचाही शोध साईभक्त घेत आहेत. एका पुराव्यांनुसार साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते. एवढंच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचीही माहिती आहे. त्यामुळे येथंही तीर्थस्थळ असून विकासासाठी शंभर कोटी देण्याची मागणी केली आहे.

साईबाबांच्या जन्मास्थानासंदर्भात एकूण 27 पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्यातील एका पुराव्यांमध्ये साईबाबा हे पाथरीहून औरंगाबाद मार्गे शिर्डीला जात होते. त्यावेळी ते काही काळ बीडमध्ये वास्तव्यास होते एवढेच नाही तर बीडमध्ये साईबाबांनी काही दिवस नोकरी केल्याचाही संदर्भात असल्याचे पुरावे पाथरीच्या ग्रामस्थांकडे आहेत. त्याचाच संदर्भ घेत आता बीडकर पुढे सरसावले आहेत. साईबाबांच्या प्रवासामध्ये बीड हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचे बीडकर सांगत आहेत.

SaiBaba Birthplace Row | साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा, विकासासाठी 100 कोटीच्या निधीची मागणी |



साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. 4 ते 5 वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे साईभक्त पाटणकर म्हणाले.

किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आहे. अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले. याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन तिथून ते शिर्डीला गेले. मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो, माझा जन्म पाथरीत झाला असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितलं होतं याचा उल्लेख आहे. शिर्डीत आर्थिक विकास खूप झाला.  मात्पार थरी उपेक्षित राहिली. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Shirdi SaiBaba Birthplace Conflict | साईंच्या जन्मस्थळाच्या वादामुळं पुकारलेला शिर्डी बंद मागे

Sai Baba Birth Place Conflict | मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शिर्डीकरांचं समाधान, बेमुदत आंदोलनही मागे