Sadabhau Khot On Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थनं केलं आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. यानंतर तिला अटक करण्यात आली असून सध्या ती पोलिस कोठडीत आहे.
सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की, केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं ते म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? असंही खोत म्हणाले.
प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केला
प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केला आहे आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे, असं खोत म्हणाले. राजकारणाच्या आखाड्यात देवदेवतांवर आरोप प्रत्यारोप या राज्यामध्ये पहिल्यांदा होत आहेत. जुन्या गोष्टी उकरून काढून ब्राम्हण समाजाला टार्गेट करायचं आणि बहुजन समाजाची सहानुभुती मिळवायची असं सुरु आहे, असं ते म्हणाले. देव देवतांबाबत भावना व्यक्त केल्या तर त्यांना जातीयवादी ठरवल जातं आणि दुसऱ्या बाजूने राज्याचे ज्येष्ठ नेते हे ज्यावेळी हिंदू देव देवतावर बोलतात त्यावेळी कौतुक केलं जातं. औरंगजेबाच्या बाबतीत तुमच्या जिभेला लगाम बसतो, असं ते म्हणाले.
सरकारने माझ्या जेलवारीची तयारी केली आहे
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. सरकारने माझ्या जेलवारीची तयारी केली आहे, कालांतराने माझ्यावर गुन्हे दाखल होतील परंतु त्याची भीती मला नाही. शकुनी मामांनी सतरंजीवर चाली टाकलेल्या आहेत. जनतेच्या बाजूने बोलल्यानंतर सरकार आवाज दाबते आहे अशी टीका खोत यांनी केली आहे. खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली. सरकार कट कारस्थान करणारे कौरवाची फौज आहे. कंसाचा वध करायला श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस जन्माला आले आहेत. तुमच्या बापांचा बाप देवेंद्र फडणवीस आहेत.सरकार माझी जेलवारी करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. त्यांनी मला काही फरक पडणार नाही. 20 मे च्या सभेत सरकारचे षडयंत्र उघडे करणार, त्यानंतर ते मला अडकवणार हे नक्की, असे खोत म्हणाले.
संबंधित बातम्या :