Saamana on PM Modi Degree: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. आता या वादात ठाकरे गटानं उडी घेतली आहे. मोदींना (PM Modi) तुमची इयत्ता कंची? असं विचारल्यावर हा बदनामीचा कट आहे, असं म्हटलं जातं. मुळात पदवी विचारल्यावर यात लपवण्यासारखं काय आहे? असा सवाल आजच्या सामनातून (Saamana Editorial) करण्यात आला आहे. 'मोदींची 'उगाच' बदनामी' या मथळ्याखाली आज सामनात अग्रलेख प्रकाशित करण्यात आला आहे. "देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे, असं म्हणत मोदींच्या पदवीवरुन टोलाही लगावण्यात आला आहे. 


"विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. आता मोदी यांनी भोपाळला जाऊन आणखी एक विनोदाचा भोपळा फोडला आहे. मोदी म्हणतात, ''माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून 'सुपारी' दिली आहे.'' मोदी पुढे असेही म्हणतात की, माझी कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण तुफान हास्यास्पद व खोटारडेपणाचा कळस आहे. याआधी मोदी म्हणत होते, लोक मला शिव्या देतात. माझ्या मरणाची प्रार्थना करतात. मला घालून पाडून बोलतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय.", असं सामनात म्हटलं आहे. 


पंतप्रधानांच्या पदवीवरुन सामनात म्हटलंय की, "देशासाठी असे घातक निर्णय पंतप्रधान घेतात की कोणी अनपढ, गंवार मंडळी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि त्याचा खुलासा पंतप्रधानांची डिग्रीच करू शकते. अगदी कोरोनासारख्या महामारीचे संकट आपल्या देशावरही आदळले तेव्हाही 'थाळ्या वाजविणे,' 'पणत्या पेटविणे' असे प्रकार जनतेला करायला सांगितले गेले. त्यामुळे कोरोना पळून जाईल असे हास्यास्पद दावे केले गेले. वास्तविक कोणताही विज्ञाननिष्ठ, सुशिक्षित राज्यकर्ता अशा गोष्टी करणार नाही, मात्र आपल्याकडे त्या झाल्या. त्यातूनही काही प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेलेच होते. अशा सगळ्याच प्रश्नांवर मोदी यांनी त्यांची डिग्री दाखविणे हेच एकमेव उत्तर आहे, मात्र त्याऐवजी ते मौन बाळगत आहेत." 


सध्या पंतप्रधान मोदींच्या पदवीवरुन देशाच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. अशातच विरोधक या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. जाणून घेऊया काय म्हटलंय सामना अग्रलेखात? 


सामना अग्रलेख : मोदींची 'उगाच' बदनामी


सध्या ज्या पद्धतीचा राज्यकारभार देशात सुरू आहे, त्यामुळे जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची 'छीःथू' सुरू आहे. राहुल गांधी यांना बनावट खटल्यात शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या आहे व जगातील अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली.


मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे. EntirePoliticalScience ची डिग्रीही त्याच पेऱ्यातून उगवली आहे. या सगळय़ावर उत्तर देण्याची 56 इंची छाती आहे काय?


विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. आता मोदी यांनी भोपाळला जाऊन आणखी एक विनोदाचा भोपळा फोडला आहे. मोदी म्हणतात, ''माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून 'सुपारी' दिली आहे.'' मोदी पुढे असेही म्हणतात की, माझी कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण तुफान हास्यास्पद व खोटारडेपणाचा कळस आहे. याआधी मोदी म्हणत होते, लोक मला शिव्या देतात. माझ्या मरणाची प्रार्थना करतात. मला घालून पाडून बोलतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. मुळात पंतप्रधानांची बदनामी कोण करतोय? माझ्या बदनामीची 'सुपारी' घेतलीय अशी टोचणी त्यांना का लागलीय याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतःच केले पाहिजे. मोदींच्या बोगस डिग्रीचा विषय सध्या गाजतो आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, ''मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही'' व नंतर अचानक मोदी यांची 'एमए'ची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची 'डिग्री' फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी? पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करा अशी याचिका अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने केजरीवाल यांनाच 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे मोदींची जास्तच बदनामी झाली व ती गुजरातच्या न्यायालयाने केली. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा


अधिकार प्रत्येक नागरिकाला


आहे. पण मोदी यांना ''तुमची इयत्ता कंची?'' असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे? मोदी जी 'डिग्री' दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर 'लिपी शैली'त Master लिहिले आहे, पण ती 'लिपी शैली'च 1992 साली आली व मोदींची डिग्री 1983 सालची आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. आता त्याही पुढे जाऊ. मोदींनी 1979 साली बी. ए. केले. 1983 साली एम. ए. केले. मग 2005 साली त्यांनी का सांगितले की, ''माझे काहीच शिक्षण झाले नाही.'' याचे उत्तर मोदींनी द्यायला हवे व कोणी त्यांच्या डिग्रीवर आणि शिक्षणावर प्रश्न विचारले की, ''पहा, माझी बदनामी सुरू आहे'' असे सांगणे म्हणजे 'व्हिक्टिम कार्ड' खेळण्यासारखेच आहे. मोदींनी गुजरातच्या स्टेशनवर चहा विकला की नाही? या रहस्याप्रमाणेच मोदींची डिग्री हासुद्धा एक रोमांचक रहस्यपट आहे. देशाला 'अडाणी' पंतप्रधान नको अशी पोस्टर्स दिल्लीत लागताच पोलिसांनी ती पोस्टर्स फाडली व पोस्टर्स लावणाऱ्यांना अटक केली. देशाला शिकलेला पंतप्रधान हवा असे बोलणे यात मोदींची अशी काय बदनामी झाली? मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी 'एम. ए.' केले. त्यामुळे ते 'अनपढ' आहेत असे कसे म्हणावे? फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत. आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृषी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे. देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग बरबाद झाला आहे. मोदींचे मित्र 'अदानी' यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशासाठी असे घातक निर्णय पंतप्रधान घेतात की कोणी अनपढ, गंवार मंडळी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि


त्याचा खुलासा


पंतप्रधानांची डिग्रीच करू शकते. अगदी कोरोनासारख्या महामारीचे संकट आपल्या देशावरही आदळले तेव्हाही 'थाळ्या वाजविणे,' 'पणत्या पेटविणे' असे प्रकार जनतेला करायला सांगितले गेले. त्यामुळे कोरोना पळून जाईल असे हास्यास्पद दावे केले गेले. वास्तविक कोणताही विज्ञाननिष्ठ, सुशिक्षित राज्यकर्ता अशा गोष्टी करणार नाही, मात्र आपल्याकडे त्या झाल्या. त्यातूनही काही प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेलेच होते. अशा सगळय़ाच प्रश्नांवर मोदी यांनी त्यांची डिग्री दाखविणे हेच एकमेव उत्तर आहे, मात्र त्याऐवजी ते मौन बाळगत आहेत. आताही अदानींच्या कंपन्यांत 20 हजार कोटी रुपये कोणाचे? अदानी तुमचे कोण लागतात? व पंतप्रधान त्यांना का वाचवत आहेत? देशातील 140 कोटी जनतेला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र या साध्या प्रश्नांवरदेखील ते तोंड उघडायला तयार नाहीत. उलट हे प्रश्न विचारल्याने मोदींची बदनामी होत आहे, अशी बतावणी केली जात आहे. यामागचे गौडबंगाल काय आहे? सध्या ज्या पद्धतीचा राज्यकारभार देशात सुरू आहे, त्यामुळे जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची 'छीःथू' सुरू आहे. राहुल गांधी यांना बनावट खटल्यात शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या आहे व जगातील अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. देशाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत व त्याला जबाबदार मोदी व त्यांचे अंध भक्त आहेत. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे. Entire Political Science ची डिग्रीही त्याच पेऱ्यातून उगवली आहे. या सगळय़ावर उत्तर देण्याची 56 इंची छाती आहे काय?