Rupali Chakankar on Rohini Khadse  : राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे.  ज्यांचा अभ्यास नाही, त्यांच्यासोबत आपण काय वक्तव्य करणार असा टोला महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना लगावला. गेल्या दोन वर्षांमध्ये त्या साड्या आणि टिकलीवर आंदोलन करणार आणि आता पुढील पाच वर्षे देखील त्यावरच आंदोलन करणार. कारण त्यांची वैचारिकता नाही असे चाकणकर म्हणाल्या. त्यामुळं या लोकांवरती चर्चा करण्यापेक्षा आपण चांगले काम करणे महत्त्वाचे आहे, असे चाकणकर म्हणाल्या. विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत. त्यामुळं साडी आणि टिकली पुढे त्या जात नाहीत, मला कौतुक वाटते त्यांचे असेही चाकणकर म्हणाल्या. 


सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्यावर वक्तव्य केली जातायेत


खडसे बाईंची संघटना आहे ती मी बांधलेली आहे. त्यांना ती संघटनाच नीट चालवता येत नाही. सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर मीडियासमोर दिसते. काल कार्यक्रम केले कुठेही बातमी झाली नसेल, त्यामुळं रूपाली चाकणकरांवर बोलल्यानंतर बातमी झाली की नाही ही ताकद आहे रूपाली चाकणकरची असेही त्या म्हणाल्या. हेमंत वाणी आणि त्यांच्या पत्नी यांनी खऱ्या अर्थाने मूळ राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. आज त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. खऱ्या अर्थाने आता इथे प्रश्न सुटतील असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी रोहिणी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली.


लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासूनच विरोधकांचे पोट दुखायला सुरुवात झाली


जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हापासूनच विरोधकांचे पोट दुखायला सुरुवात झाली आहे.  विरोधक कोर्टापर्यंत गेले. हेच विरोधक लाडक्या बहिणीची बॅनरबाजी करुन सर्व फायदे घेत होते. एक कलमी कार्यक्रम करत होते. यशस्वी ठरलेली योजना आहे. जो शब्द दिलाय तो तत्परतेने पूर्ण करेल असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांनी ठामपणे त्यांचे प्रश्न मांडावेत,आम्ही त्यांना विश्वास देऊ, समाजातील विकृती ठेचून काढायची आहे असे चाकणकर म्हणाल्या. 


महत्वाच्या बातम्या:


शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप