मुंबई : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आदरणीय साहेब, आपण महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रथमच पुणे शहराला दिली. विद्येच्या माहेरघरातील आपल्या विचारसरणीची भुमिका महाराष्ट्रभर नेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी नियुक्तीनंतर दिली आहे. आपण संघटनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली,हाच संघटनेतील कार्यकर्ताचा बहुमान आहे. महिलांचा मान आणि सन्मान हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होऊ शकतो हे आम्ही नेहमीच अनुभवत आलोय, आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
आजपर्यंत पुणे शहरात ज्या पद्धतीने पक्षाची भूमिका व विचार मांडले, संघटनेची बांधणी केली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात महिला संघटनेचे नेतृत्व करून आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, चित्रा वाघांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2019 06:22 PM (IST)
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. पुण्याच्या माजी शहराध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -