लातूर : आमचा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, गुणवत्तेला प्राधान्य मिळालेच पाहिजे यासाठी लातूरसह राज्यातील 30 जिल्ह्यातून आज रन फॉर मेरिट हे अभियान घेण्यात आले. सकाळी सात ते नऊ यावेळेत लातूरच्या रस्त्यावर हजारो लोक उतरले होते. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळीच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. कोणत्याही घोषणा न देतात निघालेल्या या रॅलीने लातूरकरांचे लक्ष वेधले होते. देशात एकीकडे आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी अनेक आंदोलनं होत आहेत. आरक्षणामुळे अनेकदा गुणवत्ता असूनही अनेकांना संधी मिळत नाही. देशात गुणवत्ता डावलली जात असेल तर सक्षम राष्ट्र कसे निर्माण होऊ शकते. गुणवत्ता असणाऱ्याला प्राधान्य द्या. हे करत असताना आरक्षणाला विरोध करायचा नाही, अशी भूमिका घेत मेरिट बचाव देश बचाव असा नारा घेऊन अभियान उभे करण्यात आले.

या अंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यात आज रन फॉर मेरिट आयोजित करण्यात आले होते. मागच्या काळात राज्यात शिक्षण व नोकऱ्यात आरक्षणाचे प्रमाण वाढले आहे .परिणामी गुणवत्तेवर अन्याय झाला आहे. गुणवत्तेला न्याय मिळावा या साठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत अनेक मोर्चे कायद्याच्या चौकटीत राहून काढण्यात आले.

भारतीय घटनेचे उल्लंघन करून लागू केलेल्या आरक्षणाविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. त्यांची सुनावणी नजीकच्या काळात होणे अपेक्षित आहे. समाजातील गुणवत्तेवर होणाऱ्या अन्यायाची जनजागृती व्हावी, गुणवतेला न्याय मिळावा म्हणून रन फॉर मेरिट हा कार्यक्रम एकच दिवशी एकाच वेळी 30 शहरात आयोजित करण्यात आला. समाजातील सर्व नागरिकांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला न्याय मिळावा, सर्वांनाच शिक्षण आणि नोकरीमध्ये गुणवत्तेनुसार अधिकार मिळावेत, गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि नागरिकांना सन्मान व प्रोत्साहन मिळावे, कुठल्याही वर्गाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि नागरिकांवर अन्याय होऊ नये, ही या चळवळी मागची भावना आहे. आज सकाळी सात वाजता मारवाडी राजस्थान हायस्कूलच्या मैदानातून ही रॅली काढण्यात आली. शिवाजी चौक, गांधी चौक मार्गे ही रॅली वापस मारवाडी राजस्थानी हायस्कूल च्या मैदानावर आली. या रॅलीत हजारोच्या संख्येत लोक आले होते. कोणत्याही घोषणा न देतात अतिशय शांततेत ही रॅली काढण्यात आली. यावेळी गुणवत्तेला प्राधान्य द्या असे फलक हातात घेऊन अनेक जण ह्या रॅलीत सहभागी झाले होते.

काँग्रेसनं शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेलं :चंद्रकांत पाटील

सेव्ह मेरिट सेव नेशन वॉकथॉनसाठी शेकडो जालनाकर रस्त्यावर -
जालना येथे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संयोजन समितीच्या वतीने आयोजित सेव्ह मेरिट सेव नेशन रॅली काढण्यात आली. शहरातील मस्तगड चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. ज्यात शेकडो जालनाकर सहभागी झाले होते, संविधानाने दिलेल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन आरक्षणाचं वाटप करण्यात येत आहे. परिणामी गुणवत्ता असून देखील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वंचीत राहत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली. शहरातील मुख्य चौकातून निघालेल्या या रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.

सुनावणीवेळी शरद पवारांचा उल्लेख झाल्यानं कोर्टात गदारोळ

अत्याधिक आरक्षण धोरणाविरोधात पुण्यात रन फॉर मेरीट
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो ते सावरकर स्मारक डेक्कन या मार्गावर सकाळी 7 वाजता रन फॉर मेरीट ची सुरुवात झाली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, व्यापारी, अशा एकूण 700 ते 800 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी भुमिका स्पष्ट केली. राज्यात सुरू असलेले अत्याधिक आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांच्या मुळावर उठले आहे. त्याविरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई सेव्ह मेरिट सेव नेशन लढत आहे. आरक्षण धोरणाचा पुनर्विचार होऊन हळूहळू आरक्षण कमी व्हायला हवे व शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा खरा लाभ मिळायला हवा. परंतु आज असे होत नाही, असं ते म्हणाले.

Maratha Reservation | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | ABP Majha