Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (RTMNU) अधिसभा (सिनेट) निवडणुकीचे निकाल आले आहे. या निकालात शिक्षण मंचाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेत. विद्यापीठात जमनालाल बजाज भवनात मतमोजणी पार पडली. मतमोजणी तीन वेगवेगळ्या गटातील 25 पैकी 15 जागेवर शिक्षण मंच तर 8 जागेवर महाआघाडीचे उमेदवार निवडून आले आहे. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालात शिक्षण मंचाच्या पदाधिकारी यांनी रात्री जल्लोष केला. हार फुल देत विजयी उमेदवाराचे स्वागत करत आणि नाचत जल्लोष केला.


यामध्ये महाविद्यालय व्यवस्थापन गटात 5 जागेपैकी 3 जागेवर शिक्षण मंचाने तर 2 जागेवर महाआघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तेच प्राचार्य गटातून 10 पैकी 6 जागेवर शिक्षण मंचाने तर 4 जागेवर महाआघाडीने विजय मिळवला आहे. शिक्षक गटातील खुल्या आणि आरक्षित प्रवर्गातून 10 जागे पैकी 6 जागेवर शिक्षण मंचाचे उमेदवार निवडून आणलेत. तर महाआघाडीला दोन आणि न्यूटाला दोन जागा जिंकल्या आहेत.


नागपूर विद्यापीठात शिक्षण मंचाचे वर्चस्व होते. तेच आज आलेल्या निकालातसुद्धा शिक्षण मंचाने आघाडी घेतली. या निवडणुकीत शिक्षण मंचाला तीन संघटना, म्हणजे यंग टीचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन या तीन संघटनांनी मिळून शिक्षण मंचाला मोठं आव्हान दिले होते.


महाआघाडीचे नेतृत्व करत असलेले अॅड. अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे यांच्या परिवारातील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विद्यापीठ अधिसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळाच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी दहा वाजतापासून सुरुवात झाली. विद्यापीठ शिक्षक मतदारसंघातून महाआघाडीचे तीनही उमेदवार विजयी झाले. यात खुल्या वर्गातून ओमप्रकाश चिमणकर, अनुसूचित जमाती वर्षा धुर्वे तर महिला गटातून पायल ठवरे यांचा समावेश आहे. या गटात अपक्ष उभे असलेले राहूल खराबे यांनी चिमणकर यांना चांगलीच टक्कर दिली. शिक्षक गटात शिक्षण मंचाला हवे तसे यश मिळवता आले नसले तरी व्यवस्थापन प्रवर्गाच्या पाच जागांमध्ये शिक्षण मंचाचे अजय अग्रवाल, उमेश तुळसकर आणि आर.जी.भोयर विजयी झाले. प्राचार्य प्रवर्गातील दहा जागांमधून मंचाला सहा जागांवर विजय मिळवता आला.


विजयी उमेदवार...


विद्यापीठ शिक्षक


ओमप्रकाश चिमणकर - महाआघाडी
वर्षा धुर्वे - महाआघाडी
पायल ठवरे - महाआघाडी


व्यवस्थापन प्रवर्ग


डॉ. बबनराव तायवाडे - महाआघाडी
स्मिता वंजारी - महाआघाडी
अजय अग्रवाल - शिक्षण मंच
उमेश तुडसकर - शिक्षण मंच
आर.जी. भोयर - शिक्षण मंच


प्राचार्या गट


महेंद्र  ढोरे - शिक्षण मंच
निळकंठ लंजे - शिक्षण मंच
सचिन उंटवाले - शिक्षण मंच
जयवंत वडते - शिक्षण मंच
रामदास आत्राम - शिक्षण मंच
देवेंद्र भोंगाडे - शिक्षण मंच
जगदीश बाहेती - महाआघाडी
संजय धनवटे - महाआघाडी
शरयू तायवाडे - महाआघाडी
चंदू पोपटकर - महाआघाडी


ही बातमी देखील वाचा


Bhavana Gawali: ठाकरे गटाचे कार्यकर्ते माझ्या अंगावर आले, खासदार भावना गवळींचा आरोप; अकोल्यातील गोंधळावर तक्रार दाखल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI