Raksha Khadse : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. 


मात्र भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे. तर तब्बल 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) कायम आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या कधीही संपर्कात राहिल्या नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.


203 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे


यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष सुनील काळे म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली. या उमेदवारी विरुद्ध संपूर्ण कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे 203 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


...तर आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यास तयार


ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष गोलू राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची अशी पद्धत आहे की, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची आठवण केवळ निवडणुका लागल्यावरच येते. निवडणूक संपली की, आमदार खासदार कोणीच ओळखत नाहीत. त्यामुळे आमची विनंती आहे की, या लोकांचा विचार ऐकूनच समोरच्या व्यक्तीला तिकीट जाहीर केले पाहिजे. रक्षा खडसे यांच्याबाबत आमची नाराजी आहे. भाजपने दुसऱ्या इच्छुक उमेदवारांपैकी कोणालाही तिकीट दिले तर आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यास तयार आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार - एकनाथ खडसे


एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, रावेर लोकसभा मतदार संघासाठी सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. पक्षाच्या आदेशप्रमाणे आम्ही काम करू, पक्षासाठी काम करू. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार  ज्या प्रमाणे बारामतीत एकमेकांविरोधात प्रचार करत आहेत. त्याच पद्धतीने आपण रक्षा खडसेंविरोधात देखील प्रचार करणार आहोत. पक्ष जो आदेश देईल त्या नुसार आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Sujay Vikhe Patil : गेल्या वेळी एकमेकांच्या विरोधात लढले, आता सुजय विखे-संग्राम जगतापांचा एकत्रित प्रचार


लोकसभा निवडणूक का लढणार नाही? रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार का? सगळ्या प्रश्नांचा एकनाथ खडसेंनी कंडका पाडला